छत्तीसगड-ओडिशा सीमेवर आज सकाळी झालेल्या चकमकीत 14 नक्षलवादी ठार झाले. गरियाबंद जिह्यातील मैनपूर कुल्हाडीघाट जंगल परिसरात नक्षलवादी मोठय़ा संख्येने जमल्याची माहिती मिळाली होती. या माहितीनुसार केंद्रीय राखीव पोलीस दल, ओडिशा आणि छत्तीसगड पोलिसांनी केलेल्या संयुक्त कारवाईत माओवाद्यांचा खात्मा झाला. छत्तीसगड-ओडिशा सीमेवर असलेल्या भालू दिग्गी जंगलात 1000 जवानांनी जवळपास 60 नक्षलवाद्यांना घेरले. छत्तीसगड पोलिसांनी ओडिशा राज्याचा प्रभारी, केंद्रीय समिती सदस्य जयराम ऊर्फ चलपती याचाही खात्मा केला. त्याच्यावर एक कोटींपेक्षा अधिकचे बक्षीस होते.