एनसीबीचे माजी मुंबई झोनल डायरेक्ट समीर वानखेडे यांनी अजित पवार गटाचे नवाब मलिक यांच्याविरोधात अॅट्रॉसिटीअंतर्गत दाखल केलेल्या गुन्ह्यात कोणतेही पुरावे आढळले नाहीत. त्यामुळे याप्रकरणी क्लोजर रिपोर्ट दाखल करून तपास बंद करणार असल्याची माहिती पोलिसांनी हायकोर्टाला दिली. न्यायालयाने याची दखल घेत हे प्रकरण निकाली काढले.
सन 2022 मध्ये जात पडताळणी समितीने समीर वानखेडे यांना क्लीन चिट दिल्यानंतर त्यांनी मलिक यांच्याविरुद्ध अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती कायद्याच्या तरतुदींनुसार गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल करूनही पोलिसांनी मलिक यांच्याविरुद्ध कोणतीच कारवाई न केल्याने वानखेडे यांनी अॅड. राजीव चव्हाण यांच्यामार्फत याचिका केली होती.