पालकमंत्र्यांची भूमिका काय? ग्रामस्थ अजित पवारांना भेटणार

बीड जिल्हय़ाचे पालकत्व अजित पवार यांनी स्वीकारले आहे. संतोष देशमुख यांच्यासाठी आम्ही न्याय मागत आहोत, पालकमंत्री म्हणून तुमची काय भूमिका आहे? हे विचारण्यासाठी मस्साजोगचे ग्रामस्थ अजित पवारांना भेटणार आहेत.

संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात संशयाचे धुके दाटल्याने धनंजय मुंडे यांना पालकमंत्री करू नये, अशी जोरदार मागणी करण्यात आली. धनंजय मुंडे यांना पालकमंत्रीपदापासून दूर ठेवण्यात आले आणि स्वतः अजित पवार यांनी बीडचे पालकत्व स्वीकारले. पालकमंत्री हा संपूर्ण जिल्हय़ाचा पालक असतो. संतोष देशमुख यांच्यासाठी आम्ही न्याय मागत आहोत. आमची भूमिका न्यायाची आहे. अजित पवार जेव्हा बीडला येतील तेव्हा पिंवा ते मस्साजोगला आले तर आम्ही त्यांना भेटणार आहोत, असे ग्रामस्थांनी सांगितल्याचे धनंजय देशमुख यांनी सांगितले.