रायगडचे पालकमंत्री बनवा तरच संघटनेचे काम करू अशी धमकीच मंत्री भरत गोगावले यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिली आहे. तर सह-पालकमंत्री बनवणे खपवून घेणार नाही असा संताप आमदार महेंद्र थोरवे यांनी व्यक्त केला आहे. आज गोगावले समर्थकांनी शिंदे यांच्या मुक्तागिरी बंगल्याबाहेर शक्तीप्रदर्शन करत राजीनामे दिले. त्यामुळे शिंदे यांना दरेगाव सोडून मुंबईला रवाना व्हावे लागले.