डोनाल्ड ट्रम्प यांनी 20 जानेवारीला अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची दुसऱ्यांदा शपथ घेतली. अमेरिकेत निर्वासित लोकांची संख्या मोठ्या प्रमाणात असून डोनाल्ड ट्रम्प यांनी निर्वासित लोकांच्या हद्दपारीच्या मुद्द्यावर मोठ्या प्रमाणात प्रचार केला होता. त्यामुळे ट्रम्प यांनी शपथ घेतल्यानंतर आता अमेरिकेतली निर्वासितांवर टांगती तलवार लटकत आहे.
अमेरिकेने त्यांच्या देशातील निर्वासित लोकांच्या हद्दपारी योजनेवर काटेकोरपणे काम करण्याचा निर्णय घेतला जाणार आहे. त्यामुळे अमेरिकेतील 18 हजार हिंदुस्थानी लोकांवर हद्दपार होण्याची टांगती तलवार आहे. अमेरिकेत राहत असलेल्या 18 हजार हिंदुस्थानी लोकांना अमेरिका माघारी पाठवले जाऊ शकते.
काही वर्षांपासून सीमा ओलांडून अमेरिकेत घुसखोरी करणाऱया नागरिकांची संख्या वाढली. 90 हजार हिंदुस्थानी नागरिकांना पकडले गेले आहे. त्यांच्यावर अमेरिकेत बेकायदेशीर प्रवेश करण्याचा आरोप आहे. अमेरिकेत जाणाऱया हिंदुस्थानी लोकांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली. अमेरिकेत शिक्षण घेण्यासाठी सुद्धा हिंद्स्थानातील अनेक राज्यातील विद्यार्थ्यांची संख्या झपाट्याने वाढत आहे.