पुण्यात भरदिवसा स्टील कंपनीच्या व्यवस्थापकावर बेछूट गोळीबार

महाराष्ट्रात ना कायदा ना सुव्यवस्था अशी स्थिती असून पुणे जिल्हा गोळीबाराच्या घटनेने पुन्हा हादरला. चाकण औद्योगिक परिसरात आज एका स्टील कंपनीतील व्यवस्थापकावर दुचाकीवरून आलेल्या दोन हल्लेखोरांनी पिस्तुलातून बेछूट गोळीबार केला. ही घटना सकाळी पावणेअकराच्या सुमारास वराळे येथील पैलाश स्टील कंपनीत घडली. हल्ल्याचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. हल्लेखोरांच्या शोधासाठी दहा पथके रवाना करण्यात आली आहेत. अजय विक्रम सिंग असे जखमी व्यवस्थापकाचे नाव आहे.