अभिनेता सैफ अली खान याच्यावर झालेल्या जीवघेण्या हल्ल्यानंतर प्रसारमाध्यमे व सोशल मीडियात दिवसरात्र सुरू असलेल्या गुऱहाळामुळे त्याची पत्नी अभिनेत्री करिना कपूर चांगलीच संतापली आहे. बस्स झालं, थांबवा हे सगळं असे म्हणत आज सोशल मीडियावरून करिनाने नाराजी व्यक्त केली.
पापाराझीने सोशल मीडियावर करिनाच्या घराबाहेरील एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यावर तैमूर व जेहसाठी नवीन खेळणी आणली, असे लिहिलेले दिसतेय. हा व्हिडीओ आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर रिपोस्ट करत ‘बस्स झालं… थांबवा हे सगळं’ अशा शब्दांत करिनाने आपला संताप व्यक्त केला. हल्ल्यानंतर करिनाने पोस्ट केली होती व हा कुटुंबासाठी कठीण काळ असल्याचे नमूद करत आमच्या प्रायव्हसीचा आदर करा. यातून बाहेर पडण्यासाठी आम्हाला काही वेळ द्या, अशी विनंती केली होती. मात्र त्यानंतरही माध्यमांचा वॉच थांबत नसल्याने करिनाचा राग अनावर झाला.