कांजूरमधील रस्ते झाले प्रकाशमय, स्थानिकांनी शिवसेनेचे मानले आभार

शिवसेनेच्या पुढाकाराने कांजूर विभागातील एकवीरा नगर, शास्त्राrनगर, पंचशील नगर, मोहटा देवी परिसरातील रस्त्यांवर 30 विजेचे खांब बसविण्यात आले आहे. त्यामुळे येथील रस्ते प्रकाशाने उजळून निघाले असून नागरिकांची काळोखापासून सुटका झाली आहे. यामुळे नागरिकांनी शिवसेनेचे आभार मानले आहेत.

कांजूर विभागातील एकवीरा नगर, शास्त्राrनगर, पंचशील नगर, मोहटा देवी परिसरातील नागरिकांना अंधारातून चाचपडत कांजूर बाजारपर्यंत जावे लागत होते. वयोवृद्ध नागरिकांना काळोखातून उपचारासाठी रुग्णालयात जावे लागत होते. नागरिकांना परिवार सोसायटीच्या मैदानात फिरावयास यावयाचे असल्यास त्यांना काळोखाशी सामना करावा लागत असे. शाळेतील विद्यार्थ्यांना शिकवणीसाठी याच काळोखातून जाणे-येणे होत असे. स्थानिक आमदार सुनील राऊत यांनी या परिसराची पाहणी केली त्यानंतर तातडीने त्यांनी महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळातून विजेचे खांब बसवून घेतले. त्यावर दिवाबत्तीची सोय केल्यामुळे विभाग प्रकाशाने उजळून निघाला आहे.

यामुळे स्थानिक नागरिकांनी आमदार सुनील राऊत यांचा जाहीर सत्कार केला. यावेळी म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेना अध्यक्ष बाबा कदम यांनी त्यांचे आभार मानले. विद्युत मंडळाचे अधिकारी दास, अनंत पाताडे, दीपक सावंत, रवी महाडिक, सचिन चोरमुले, तानाजी मोरे, सुधाकर पेडणेकर, मामा मंचेकर, दत्ता पालेकर, विश्वास तुपे, दीपाली पाटील, मामी मंचेकर, सुमन म्हसकर, प्रज्ञा आंबेरकर, योगेश पेडणेकर, मामा पाटील, गीते साहेब, किशोर कांबळे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.