व्हिडीओ पाहून लोक हैराण, भिकाऱ्याच्या हातात आयफोन 16 प्रो मॅक्स

राजस्थानमधील अजमेर येथे हजरत ख्वाजा मोईनुद्दीन चिश्ती यांच्या उरूससाठी देश-विदेशातील कानाकोपऱयातून लोक या ठिकाणी येतात. परंतु, या ठिकाणचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. या ठिकाणी भीक मागणाऱया एका भिकायाकडे चक्क आयफोन 16 प्रो मॅक्स हा सर्वात जास्त महागडा फोन दिसला. हातात आयफोन घेऊन हा भिकारी लोकांकडे भीक मागत आहेत. भिकाऱयाच्या हातात असलेल्या आयफोनने अनेकांचे लक्ष वेधले असून त्याची सोशल मीडियावर चर्चा सुरू झाली आहे. व्हिडीओत भिकारी सुद्धा मोठय़ा अभिमानाने आयफोन वापरत असल्याचे सांगत आहे.

हिरो-हिरोईन, बडे राजकारणी, उद्योगपती यांच्या हातात दिसणार आयफोन 16 प्रो मॅक्स फोन एका भिकाऱयाच्या हातात दिसत असल्याने या धंद्यात चांगलीच कमाई दिसत आहे, अशा वेगवेगळ्या कमेंट यूजर्सकडून केल्या जात आहेत.