रोहित शर्मा रणजी खेळणार, मुंबईच्या संघात निवड; जम्मू कश्मीर विरूद्ध मैदानात उतरणार

टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा चॅम्पियन्स ट्रॉफी सुरू होण्यापूर्वी रणजी करंडकात खेळताना दिसणार आहे. रणजी करंडकासाठी मुंबईच्या संघाची घोषणा करण्यात आली असून कर्णधार पदाची धुरा अजिंक्य रहाणेच्या खांद्यावर सोपवण्यात आली आहे. तसेच या संघामध्ये रोहित शर्मा व्यतिरिक्त यशस्वी जयस्वालचा सुद्दा समावेश आहे.

बॉर्डर गावस्कर करंडकात रोहित शर्माच्या खेळ अगदीच सुमार राहिला होता. त्यामुळे त्याच्यावर टीका सुद्दा करण्यात आली, तसेच स्टार खेळाडू देशांतर्गत क्रिकेट खेळत नाहीत, असे सुद्दा बोलण्यात आले. परंतु 23 जानेवारी पासून मुंबईचा जम्मू काश्मिरविरुद्ध सामना सुरू होणार आहे. यासाठी रोहित शर्माची संघात निवड करण्यात आली आहे. रोहित शर्मा अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वात संघात खेळताना दिसणार आहे. रोहित शर्मा व्यतिरिक्त यशस्वी जयस्वाल आणि श्रेयस अय्यर यांचा सुद्दा संघामध्ये समावेश करण्यात आला आहे. हे तिन्ही खेळाडूंचा चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी इंडियाच्या संघात समावेश करण्यात आला आहे.

रोहित शर्मा तब्बल 10 वर्षांनी रणजी करंडकामध्ये खेळताना दिसणार आहे. त्याने यापूर्वी 2015 साली उत्तर प्रदेशविरुद्ध सामना खेळला होता. काही दिवसांपूर्वी चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली. तेव्हा पत्रकार परिषदेमध्ये बोलताना रणजी ट्रॉफी खेळणार असल्याचे, रोहित शर्माने सांगितले होते.

रणजी ट्रॉफीसाठी मुंबईचा संघ

अजिंक्य रहाणे (कर्णधार), रोहित शर्मा, यशस्वी जयस्वास, श्रेयस अय्यर, शिवम दुबे, शार्दुल ठाकूर, आयुष म्हात्रे, सिद्धेश लाड, हार्दिक तमोरे (यष्टीरक्षक), आकाश आनंद (यष्टीरक्षक), तनुष कोटियन, शम्स मुलानी, हिमांशु सिंह, मोहित अवस्थी, सिलवेस्टर डिसूजा, रोयस्टन डियाज आणि हर्ष कोठारी