मुंबईच्या ट्रायडंट हॉटेलमध्ये आढळला 60 वर्षीय महिलेचा मृतदेह, मृत्यूचे कारण अस्पष्ट

बईत मरीन ड्राईव्ह जवळील असलेल्या ट्रायडंट हॉटेलमध्ये एका 60 वर्षीय महिलेचा मृतदेह आढळला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून चौकशी सुरू केली आहे.

ट्रायडंट हॉटेलमधील एका रूममध्ये एक 60 वर्षीय महिलेचा मृतदेह आढळला आहे. 27 व्या मजल्यावर या महिलेने ही रूम बुक केली होती. रुम सर्व्हिससाठी आलेल्या एका कर्मचाऱ्याने दार ठोठावले. आतून काहीच प्रतिसाद न आल्याने मास्टर कीने या महिलेच्या रुमचा दरवाजा उघडण्यात आला. तेव्हा महिला मृतावस्थेत सापडली. हॉटेल प्रशासनाने याबाबत पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या प्रकरणी पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली आहे. महिलेच्या मृत्यूचे कारण अस्पष्ट असून पोलिसांनी याबाबत चौकशी सुरू केली आहे.