बीडची बदनामी तुमच्याच वाल्मीक कराडने केली…मुंडे आता राजीनाम्याची तयारी करा!  अंजली दमानिया संतप्त

बीडचा बिहार झाल्याची जाणीवपूर्वक बदनामी केली जात असल्याच्या धनंजय मुंडे यांच्या वक्तव्यावर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. त्यासंदर्भात त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट लिहिली आहे. ‘धनंजय मुंडे, बीडच्या मातीची बदनामी तुम्ही केली, तुमच्या वाल्मीक कराडनी केली, सुदर्शन घुलेनी केली, विष्णू चाटेनी केली. संतोष देशमुखसारख्या निष्पाप माणसाच्या निर्घृण हत्येने….. जाऊ द्या बोलवत नाही. बीड जिह्यातील दहशत संपवून ही माती पुन्हा पवित्र करण्याचा आम्ही प्रयत्न करतोय. तुमच्याच पक्षातील लोक आज अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी तुमच्या बीडबद्दल काय म्हणाले वाचा. ‘‘राज्यातील एका जिह्यात सुरू असलेल्या प्रकारामुळे राज्यभर पक्ष आणि पक्षनेतृत्व यांची बदनामी होतं आहे’. ‘याप्रकरणी लवकरात लवकर पक्षनेतृत्व यांनी पक्षाचा हिताचा विचार करता निर्णय घ्यायला हवा’, आगामी निवडणुकांसाठी अशा प्रकारची बदनामी होणं पक्ष हिताचं नाही’’, आता तुम्ही राजीनामा द्यायची तयारी करा,’ असे दमानिया यांनी त्यात नमूद केले आहे.