मऱहाटमोळय़ा खो-खोची अवघ्या जगाला ओळख करून देणाऱया पहिल्यावहिल्या खो-खो वर्ल्ड कपवर हिंदुस्थानच्याच महिला आणि पुरुष संघांनी आपली सत्ता दाखवली. हिंदुस्थानच्या महिला संघाने सलग सात तर पुरुष संघाने विजयाचा षटकार ठोकत जगज्जेतेपद काबीज करत हिंदुस्थानी खो-खोचा अद्वितीय पराक्रम जगाला दाखवून दिला. महिलांच्या जगज्जेतेपदाच्या लढतीत हिंदुस्थानने नेपाळचा 78-40 असा सहज पराभव केला, तर पुरुषांच्या संघानेही नेपाळचा 54-36 असा धुव्वा उडवला आणि खो-खो जगज्जेतेपदाचा डबल धमाका केला.
आज इंदिरा गांधी इनडोअर स्टेडियममध्ये खो-खोचा अभूतपूर्व उत्साह आणि जयघोष पाहायला मिळाला. दोन्ही गटांत हिंदुस्थान दुहेरी मुपुटाचा मान मिळवून देणार हे आधीपासून स्पष्ट होते. खो-खोत हिंदुस्थानचीच दादागिरी चालते, याची सर्वांना कल्पना होतीच आणि आज त्यांनी सिद्धही केले. जगज्जेतेपदाच्या दोन्ही लढतींत हिंदुस्थानने नेपाळच्या संघावर मात करत आपला दबदबा दाखवला. विशेष म्हणजे हिंदुस्थानने नॉनस्टॉप विजयांसह जगज्जेतेपद संपादले.
पुरुषांचा अंतिम सामनाही महिलांप्रमाणे फारसा रंगला नाही. नेपाळने हिंदुस्थानला चांगली लढत दिली. मध्यंतरापर्यंत नेपाळने चांगली लढत देत 18-26 असा पाठलाग केला होता. मात्र त्यानंतर हिंदुस्थानच्या आक्रमकांनी 54-18 अशी आघाडी फुलवत आपले जगज्जेतेपद निश्चित केले. शेवटच्या डावात नेपाळने 54-36 असा गुणफलक केला असला तरी त्यांनी सामना पहिल्या डावातच गमावला होता.
महिलांच्या अंतिम सामन्यात हिंदुस्थानच्या आक्रमकांनी 34 गुण टिपत ‘वर्ल्ड कप हमारा हैं’चे संकेत दिले. पहिल्या डावात कर्णधार प्रियांका इंगळे, रेश्मा राठोड यांनी चमकदार कामगिरी केली. मग दुसऱया डावात नेपाळच्या पहाडी मुलींनी कमालीचा खेळ करत हिंदुस्थानच्या ड्रीम रन गुणसंख्येला वेसण घातली. या डावात नेपाळच्या मुलींनी जोरदार खेळ करत हिंदुस्थानला आव्हान देण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. त्यामुळे मध्यंतराला 34-24 अशी गुणसंख्या झाली होती. त्यानंतर तिसऱया डावात हिंदुस्थानने सुसाट आणि भन्नाट खेळ करत नेपाळच्या संरक्षकांना आपल्या आवाक्यात घेत गुणसंख्या 73-24 करत जगज्जेतेपदावरील आपली पकड अधिक मजबूत केली. नेपाळने शेवटच्या डावात गुणफलक 73-40 असा संपवला.
हिंदुस्थानने साखळी फेरीत दक्षिण कोरिया, इराण आणि मलेशियावर विजय मिळवत उपांत्य फेरी गाठली. त्यानंतर बांगलादेशवर उपांत्यपूर्व फेरीत आणि दक्षिण आफ्रिकेवर उपांत्य फेरीत शानदार विजय मिळवत अंतिम सामन्यात प्रवेश केला.
हिंदुस्थानात या विजयाचा उत्सव सुरू आहे. घराघरात टीव्ही स्क्रीनसमोर तासन्तास खो-खोच्या सामन्यांचा आनंद घेतलेल्या चाहत्यांनी जल्लोष केला. खो-खो व्श्विचषक 2025 मध्ये हिंदुस्थानी संघाचा विजय ही केवळ खेळातील नव्हे, तर हिंदुस्थानी स्वाभिमानाची आणि परंपरेची जागतिक पातळीवरील विजयगाथा आहे!
खो-खो या पारंपरिक हिंदुस्थानी खेळाने जागतिक पातळीवर आपले अस्तित्व दाखवले आहे. हा विजय केवळ संघाचा नव्हे, तर हिंदुस्थाना क्रीडा संस्पृतीचा मोठा विजय आहे. देशभरातून खेळाडूंचे काwतुक होत असून हा क्षण पिढय़ान्प्ढिय़ा लक्षात ठेवला जाईल.
हा विजय हिंदुस्थानी महिलांचे स्वप्न साकार करणारा-इंगळे
हा विजय केवळ आमच्या संघाचा नव्हे, तर प्रत्येक हिंदुस्थानी महिलेच्या स्वप्नांचा विजय आहे. या विश्वचषकासाठी आम्ही महिनोन् महिने कष्ट घेतले, प्रत्येक खेळाडूने आपले 100 टक्के योगदान दिले आणि आज त्या सर्व मेहनतीचं फळ मिळालं आहे. महिला कर्णधारानेही या विजयाला ‘महिलांच्या प्रगतीचा आणि देशाच्या गौरवाचा क्षण असल्याचे कर्णधार प्रियांका इंगळे म्हणाली. खो-खो हा खेळ आमच्या परंपरेचा एक भाग आहे आणि आता तो जागतिक पातळीवर पोहोचला आहे, ही भावना खूप अभिमानाची आहे. प्रत्येक लहान मुलीला सांगू इच्छिते की, तुमचं स्वप्न कितीही मोठं असो, ते पूर्ण होऊ शकतं. फक्त मेहनत, विश्वास आणि जिद्द पाहिजे. आज आम्ही इतिहास रचला, पण ही फक्त सुरुवात आहे. हिंदुस्थानी महिलांचा खेळ प्रत्येक आंतरराष्ट्रीय मंचावर चमकणार याची खात्री आहे. हा विजय प्रत्येक हिंदुस्थानींसाठी समर्पित आहे.’