अभिनेता सैफ अली खानच्या घरात हल्लेखोर घुसल्याची घटना ताजी असतानाच बॉलीवूडमधील सिने दिग्दर्शकाच्या घरात चोरीचा प्रयत्न झाल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी एकाला वर्सोवा पोलिसांनी अटक केली. राहुल मुदाने असे त्याचे नाव आहे. त्याला अटक करून न्यायालयात हजर केले होते.
तक्रारदार हे बॉलीवूडमधील एका सिने दिग्दर्शकाच्या घरी प्रॉपर्टी डेक केअर म्हणून काम करतात. दिग्दर्शकाचा अंधेरीच्या चार बंगला आणि म्हाडामध्ये एक बंगला आहे. त्या बंगल्यात चित्रीकरणाचे साहित्य ठेवले जाते. तेथे केअर टेकर हा काम करतो. त्या बंगल्यात कोणी राहत नसल्याने तक्रारदार हे जाऊन तेथे पाहणी करतात. गेल्या वर्षी 28 डिसेंबरला तक्रारदार हे त्या बंगल्यात गेले होते. सर्व साहित्याची तपासणी केल्यानंतर बंगला बंद करून ते निघून गेले.
8 जानेवारीला ते तेथे गेले तेव्हा त्यांना बंगल्याच्या फ्लॅटचे टाळे तुटलेले दिसले. पहिल्या मजल्यावरील फ्लॅटमध्ये अज्ञात चोरटय़ाने साहित्य चोरीचा प्रयत्न केल्याचे त्याच्या लक्षात आले. याची माहिती त्याने वर्सोवा पोलिसांना दिली. काही वेळात वर्सोवा पोलीस घटनास्थळी आले. वर्सोवा पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा नोंद केला. पोलिसांनी तपास सुरू केला. त्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यानंतर पोलिसांनी राहुलला चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्याला अटक करून न्यायालयात हजर केले होते.