अमरावती जिह्यातील पदाधिकारी जाहीर

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने अमरावती जिह्याकरिता पदाधिकाऱयांची नियुक्ती जाहीर करण्यात आली आहे. शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकात ही माहिती देण्यात आली आहे.

आमदार गजानन लवटे – जिल्हा समन्वयक (अमरावती जिल्हा), अभिजीत ढेपे – जिल्हा संघटक (अमरावती जिल्हा), पराग गुडधे – जिल्हाप्रमुख (अमरावती, बडनेरा, तिवसा, दर्यापूर विधानसभा), मनोज कडू – जिल्हाप्रमुख (धामणगाव व वरुड मोर्शी विधानसभा), नरेंद्र पडोळे – जिल्हाप्रमुख (अचलपूर व मेळघाट विधानसभा), प्रवीण हरमकर – शहरप्रमुख (अमरावती विधानसभा), संजय शेटे – शहरप्रमुख (बडनेरा विधानसभा).