शेतकरी, व्यावसायिक, डॉक्टर कामाचे तास पाळत नाहीत; चिदंबरम यांनी केले 90 तास काम करण्याचे समर्थन

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि देशाचे माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी सुब्रह्मण्यम यांनी कर्मचाऱयांना आठवडय़ाला 90 तास काम करण्याच्या सल्ल्याचे समर्थन केले आहे. शेतकरी आणि व्यावसायिक व्यक्ती कामाच्या 8-8-8 तासांच्या मर्यादेचे पालन करत नाहीत. तसेच डॉक्टर आणि वकील तसेच शास्त्रज्ञही 8 तासांहून अधिक काळ काम करतात, याकडेही चिदंबरम यांनी लक्ष वेधले आहे.

इन्फोसिसचे सहसंस्थापक नारायण मूर्ती यांनी आठवडय़ाला 70 तास काम करण्याचा सल्ला दिला होता. त्यांच्यावर टीका झाल्यानंतर लार्सन अँड टुब्रो कंपनीचे चेअरमन एस. एन. सुब्रह्मण्यम यांनी आपल्या कर्मचाऱयांना 90 तास काम करण्याचा सल्ला दिला होता, त्यावरून उलट सुलट प्रतिक्रियाही उमटल्या होत्या. त्यानंतर आता पी. चिदंबरम हे सुब्रह्मण्यम यांनी दिलेल्या सल्ल्याच्या समर्थनार्थ पुढे आले आहेत.