नीरज चोप्रा लग्नबंधनात अडकला, लग्नाचे फोटो केले शेअर

हिंदुस्थानचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्रा लग्नबंधनात अडकला आहे. त्याने रविवारी त्याच्या सोशल मीडिया हँडलववर याची माहिती दिली आहे. नीरजने त्याच्या लागाचें फोटोही सोशल मीडियावर शेरा केले आहेत. लग्नाचे फोटो शेअर करताना नीरज म्हणाला आहे की, ”माझ्या कुटुंबासह आयुष्याचा नवा अध्यायाची सुरूवात केली. या क्षणाकरता आम्हाला एकत्र आणणाऱ्या प्रत्येक आशीर्वादासाठी मी कृतज्ञ आहे.” नीरजच्या पत्नीचे नाव हिमानी आहे.

कोण आहे हिमानी?

नीरजची पत्नी हिमानी कोण आहे, याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. नीरजने देखील याचा खुलासा केलेला नाही. समोर आलेल्या फोटोंमध्ये मुलीचे आई-वडील आणि नीरजचं कुटुंब दिसत आहे. फोटोवरून असा अंदाज वर्तवला जात आहे की, हा लग्न सोहळा अत्यंत खाजगी पद्धतीने पार पडला.

 

View this post on Instagram

 

A post shared by Neeraj Chopra (@neeraj____chopra)