Kho-Kho World Cup 2025: महिलांनंतर पुरुषांनीही मारली बाजी, हिंदुस्थानचा दुहेरी सुवर्ण इतिहास; नेपाळला हरवून विश्वविजेतेपद पटकावले!

खो-खोचा पहिला विश्वचषक दिल्लीतील इंदिरा गांधी स्टेडियमवर खेळला गेला. या स्पर्धेत हिंदुस्थानी महिला आणि पुरुष संघांचा जोरदार खेळ पाहायला मिळाला. हिंदुस्थानी संघाने नेपाळला हरवून विजेतेपद पटकावले. त्यानंतर हिंदुस्थानी पुरुष संघानेही ऐतिहासिक कामगिरी केली.

पुरुषांच्या खो-खो विश्वचषकाचा अंतिम सामना हिंदुस्थान आणि नेपाळ यांच्यात खेळला गेला. या दोन संघांमध्ये स्पर्धेतील पहिला सामनाही झाला होता. त्यात टीम इंडिया जिंकली होती. अंतिम फेरीतही असेच घडलं असून हिंदुस्थानी संघाने नेपाळला हरवून ट्रॉफी जिंकली आहे.

हिंदुस्थानच्या पुरुष आणि महिला संघांनी खो-खोच्या पहिल्या विश्वचषकात संपूर्ण स्पर्धेत आपला दबदबा कायम ठेवत पहिले विश्वविजेतेपद पटकावले. महिलंच्या सामन्यात हिंदुस्थानने नेपाळवर 78-40 असा 38 गुणांनी विजय साकारला. पुरुष अंतिम सामन्यात हिंदुस्थानने नेपाळला 54-36 असे 18 गुणांनी पराभूत केले.