दालचिनी, हिंदुस्थानी मसाल्यांमधील एक महत्त्वाचा पदार्थ. बिर्याणी, पुलाव याची चव वाढवणारा, सुगंधीत करणाऱ्या दालचिनीला आयुर्वेदामध्येही अनन्यसाधारण महत्त्व आहे. दालचिनीमध्ये असणाऱ्या अँटीऑक्सिडंट तत्वामुळे प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठीही याचा वापर केला जातो. सध्या थंडीचे दिवस सुरू आहेत. या दिवसात दालचिनीचे पाणी प्यायल्याने अनेक फायदे मिळतात.
दालचिनीमध्ये असणारे पोषणतत्व संसर्ग होण्यापासून वाचवतात, एवढेच नाही तर शरीर गरम ठेवण्यासाठी आणि त्वजा तजेलदार ठेवण्यासाठीही याचा उपयोग होतो. यात फायबरचे प्रमाणही मुबलक असल्याने पचनसंस्था सुधारण्यासाठीही याचा वापर केला जातो.
दालचिनीचे पाणी पिण्याचे फायदे
– दालचिनीचे पाणी प्यायल्याने पोटातील गॅस, बद्धकोष्ठता यासारख्या समस्यांवर आराम मिळतो.
– शरीरातील अतिरिक्त चरबी करण्यासाठी आणि वजन कमी करण्यासाठी दालचिनीचे पाणी उपयुक्त आहे. सकाळी उपाशीपोटी दालचिनीचे पाणी प्यायल्याने कॅलरी वेगाने बर्न होतात.
– मधुमेहाच्या रुग्णांसाठीही दालचिनी वरदान आहे. दालचिनीचे पाणी प्यायल्याने रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात राहते.
– दालचिनीमध्ये अँटिऑक्सिडेंट आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात. हृदयाच्या आरोग्यासाठी ते फायदेशीर असून बॅड कोलेस्ट्रॉल कमी करतात आणि गुड कोलेस्ट्रॉलला प्रोत्साहन देतात.
– सर्दी आणि घशातील खवखव या आजारांवरही दालचिनीचे पाणी उपयुक्त ठरते.
– दालचिनीचे पाणी प्यायल्याने शरीर उबदार ठेवण्यास मदत मिळते.
– हिवाळ्यात होणार्या सांधेदुखीवर आणि सूज कमी करण्यासाठी दालचिनीचे पाणी रामबाण उपाय समजला जातो.
– हिवाळ्यात त्वचा कोरडी आणि निर्जीव होते. त्वचेला तजेलदार आणि कांती नितळ बनवण्यासही दालचिनीचे पाणी उपयोगी ठरते.
– दालचिनीचे पाणी प्यायल्याने दिवसभर शरीरात ऊर्जा कायम राहते. थकवा आणि आळस दूर होतो.
Coffee Benefits: कॉफी पिल्याने खरच आयुष्य वाढतं? नवीन संशोधनातून महत्त्वाची माहिती आली समोर