दिल्लीच्या जनेतेने एवढी हिंसा कधीच पाहिली नाही, केजरीवाल यांची भाजपवर टीका

दिल्लीच्या जनेतेने एवढी हिंसा कधीच पाहिली नाही, अशी टीका दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी भाजपवर केली. तसेच भाजप दिल्ली निवडणुकीत हरणार आहे, हे त्यांना कळालंय म्हणून ते अशा प्रकारे निवडणूक लढवत आहेत असेही केजरीवाल म्हणाले.

आज पत्रकारांशी बोलताना केजरीवाल म्हणाले की, दिल्लीत अशा प्रकारे कधीच प्रचार झाला नाही. दिल्लीच्या जनतेने अशा प्रकारची हिंसा कधीच पाहिली नाही. माजी मुख्यमंत्र्यांवर जीवे मारण्याचा हल्ला झाला. माझे जीवन हे देश आणि समाजासाठी अर्पण आहे. भाजप निवडणूक हरणार आहे म्हणूनच ते अशा प्रकारे निवडणूक लढवत आहेत असेही केजरीवाल म्हणाले.