Photo – दक्षिण मध्य मुंबईत आयोजित सांस्कृतिक, कला व खेळ महोत्सवाचे आदित्य ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन

शिवसेनेतर्फे दक्षिण मध्य मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या सांस्कृतिक, कला व खेळ महोत्सवाला शनिवारपासून सुरुवात झाली. शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज मैदान येथे या महोत्सवाचे दिमाखात उद्घाटन झाले. 

Image

 

16 फेब्रुवारीपर्यंत हा महोत्सव सुरू राहणार असून या निमित्ताने दक्षिण मध्य मुंबईतील कला व क्रीडाप्रेमींना अनोखी संधी उपलब्ध झाली आहे.

Image

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त विविध स्पर्धा व उपक्रमांचा समावेश असलेला हा महोत्सव क्रीडा व सांस्कृतिकप्रेमींसाठी पर्वणी ठरणार आहे.

Image

क्रिकेट (पुरुष), क्रिकेट (महिला), फुटबॉल, खो-खो, कुस्ती, टेबल टेनिस, कॅरम, रस्सीखेच, पंजा, बुद्धिबळ, कबड्डी, जिम्नॅस्टिक्स, मल्लखांब, योगासने, दहीहंडी तसेच चित्रकला स्पर्धा आणि बरेच काही यामध्ये सामील आहे.

Image

महोत्सवाच्या उद्घाटनावेळी शिवसेना नेते दिवाकर रावते, शिवसेना सचिव साईनाथ दुर्गे, विभागप्रमुख आमदार महेश सावंत, माजी महापौर किशोरी पेडणेकर, श्रद्धा जाधव, समर्थ व्यायाम मंदिरचे उदय देशपांडे, मुंबई रणजी सलामीवीर आयुष म्हात्रे आदी उपस्थित होते.