डी. ई. एस. प्रायमरी स्कूलच्या 1200 विद्यार्थ्यांनी प्राचीन ते आधुनिक काळापर्यंतचे ३० योगा प्रकार सादर करून इंडिया वर्ल्ड बुकमध्ये नोंद करीत विश्वविक्रमाला गवसणी घातली.
(फोटो – चंद्रकांत पालकर, पुणे)
अॅक्वा योगा, स्पिरिच्युअल योगा, पावर योगा, डंबेल योगा, मल्लखांब याच्या प्रात्यक्षिकांनी उपस्थित भारावले.
सूर्यनमस्कार, चंद्रनमस्कार, ट्रायबल योगा, अॅड. निमल योगा, बर्ड पोजेस, दंड योगा, पार्टनर योगा, डंबेल रिव्होल्यूशनरी पोजेस, ताली योगा, हिदमिक योगा, इक्विमेंट योगा, थेरा बँड योगा, ब्रिक्स योगा, चेअर योगा, मेडिसनल बॉल योगा, योगा फॉर स्पोर्ट्स, डान्स योगा, पॅट्रियॉटिक मंडल योगा, अॅक्वा योगा, स्पिरिच्युअल योगा आणि पावर योगा असे प्रकार सादर केले.
ढोल-ताशा पथकाचे पालकांनी संचलन केले. मुख्याध्यापिका अर्चना धनावडे यांच्या मार्गदर्शनाखाली सिमरन गुजर, ग्रेसी डिसुझा, क्रीडाशिक्षिका योगिनी कानडे आणि सर्व शिक्षक यांनी संयोजन केले.
(फोटो – चंद्रकांत पालकर, पुणे)
डी. ई. एस.च्या नियामक मंडळ आणि परिषदेचे अध्यक्ष प्रमोद रावत, उपाध्यक्ष अॅड. अशोक पलांडे, कार्यवाह डॉ. आनंद काटिकर, डॉ. शरद कुंटे, प्रा. धनंजय कुलकर्णी, अॅड. राजश्री ठकार, खेमराज रणपिसे, मुख्याध्यापिका अर्चना धनावडे, डॉ. पल्लवी गव्हाणे, डॉ. सोपान कांगणे, विकी बारावरकर यांची प्रमुख उपस्थिती होती.