महाविकास आघाडी सरकारच्या काळात तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रेरणेतून सुरू करण्यात आलेल्या शिवभोजन थाळीची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत असून हातावर पोट असलेल्या श्रमजिवी वर्गाला या योजनेचा मोठा लाभ मिळत आहे. त्यामुळे राज्य सरकारने शिवभोजन थाळीसाठी 50 कोटी 82 लाख रुपयांचा निधी वितरित करण्याचा निर्णय घेतला आहे.
कोरोना काळात मोफत
तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पुढाकाराने सुरू झालेल्या या योजनेची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोना काळात महाविकास आघाडीच्या वतीने शिवभोजन थाळीचे मोफत वाटप करण्यात आले होते. राज्यात कडकडीत बंद असताना शिवभोजन थाळी केंद्रे सुरू होती. त्यामुळे हातावर पोट असलेल्या वर्गाला मोठा आधार मिळाला. कोरोना काळात महाविकास आघाडी सरकारने शिवभोजन थाळी मोफत दिल्यामुळे एकही भूकबळी गेला नाही. राज्यातील एसटीची विविध बस स्थानके, शासकीय कार्यालये, बाजारपेठेची ठिकाणे, यासाठी शिवभोजन थाळी केंद्र सुरू करण्यात आली आहेत. या थाळीपासून गरीब-कष्टकरी वंचित राहू नये म्हणून ज्याला या योजनेला लाभ दिला जातो त्याचा आधारकार्ड क्रमांक नमूद करून त्याचा पह्टो घेतला जातो. त्यामुळे ही योजना खऱया अर्थाने लाभार्थ्यापर्यंत पोहोचत आहे.
सर्वाधिक निधी नाशिकला
या योजनेत एप्रिल 2024 ते मार्च 2025 या कालावधीत सर्वाधिक 14 कोटी 14 लाख रुपये नाशिक जिह्याला मिळाले आहेत. त्यानंतर छत्रपती संभाजीनगरला 8 कोटी 63 लाख रुपये, जळगावला 7 कोटी 52 लाख रुपये, बीडला 5 कोटी 95 लाख रुपये, अकोला 5 कोटी 10 लाख रुपये, सोलापूर 4 कोटी 83 लाख रुपये, अहिल्यानगर 5 कोटी 38 लाख रुपये, अमरावती 2 कोटी 53 लाख रुपये, धुळे 4 कोटी 63 लाख रुपये, नंदुरबार 3 कोटी 29 लाख रुपये, जालना 3 कोटी 71 लाख रुपये, नांदेड 6 कोटी 22 लाख रुपये, धाराशीव 1 कोटी 97 लाख रुपये.
z शिवभोजन थाळी योजनेत डिसेंबर 2024 ते मार्च 2025 या कालावधीसाठी 50 कोटी 82 लाख रुपये वितरित करण्यात आले आहेत. सध्या राज्यात दररोज दोन लाख गरजू लोक शिवभोजन थाळी जेवतात. ही संख्या दहा लाख लोकांपर्यंत नेण्याची सरकारची योजना आहे.