हॉलीवूड अभिनेत्री पोहोचली मुंबईतील शिवमंदिरात

हॉलीवूड अभिनेत्री डकोटा जॉन्सन आणि तिचा बॉयफ्रेंड क्रिस मार्टिन सध्या मुंबई दौऱ्यावर आहेत. या दोघांनी एकत्रित मुंबईतील बाबुलनाथ मंदिराला भेट दिली. या भेटीचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. डकोटा जॉन्सनने यावेळी भगवान शिव यांच्या नंदीच्या कानात आपली इच्छा बोलून दाखवली. या दोघांनीही मनोभावे पूजा केली.