कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या यांच्याविरोधात ईडीची मोठी कारवाई, 300 कोटी रुपयांची संपत्ती जप्त

ईडीने कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या यांच्याशी संबंधित म्हैसूर शहर विकास प्राधिकरणशी संबंधीत मनी लाँड्रिग प्रकरणी 300 कोटी रुपयांची संपत्ती जप्त केली आहे. म्हैसूर शहर विकास प्राधिकरणाच्या जमीनीत मोठा घोटाळा केल्याचा आरोप केला जात आहे. जप्त केलेली जमीन रीएल इस्टेट व्यावसायिक आणि एजंट्सच्या नावावर होती अशी माहिती ईडीने दिली आहे.

सिद्धारामैय्या यांनी म्हैसूर शहर विकास प्राधिकरणची तीन एकर जमिनीच्या बदल्यात आपल्या पत्नीच्या नावावर असलेली 14 भुखंडासाठी नुकसानभरपाई मिळवण्यासाठी आपल्या राजकीय प्रभाव वापरला असा आरोप ईडीने केला आहे. ही जमीन म्हैसूर शहर विकास प्राधिकरणाने 3 लाख 24 हजार 700 रुपयांत अधिग्रहण केली होती. पण याची नुकसानभरपाई म्हणून 56 कोटी रुपये दिले गेले.