उत्तर प्रदेशातील प्रयागराजमधील महाकुंभ मेळ्यात सहभागी झालेली हर्षा रिछारिया सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. आता हर्षा रिछारियावरून महाकुंभमध्ये वादही सुरू झाला आहे. शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती आणि महाराज आनंद स्वरुप यांनी हर्षा रिछारियाला विरोध केला आहे. तर आखाडा परिषदेचे अध्यक्ष हर्षाच्या समर्थनात उतरले आहे. हर्षा रिछारिया ही कुंभमेळ्यातच असल्याची चर्चा आहे.
काही लोकांनी आपल्यावर टीका केली. यामुळे कुंभमेळा सोडणार असल्याचे हर्षा रिछारियाने शुक्रवारी म्हटले होते. पण अजूनही ती कुंभेळ्यातच असल्याची चर्चा आहे. निरंजनी आखाड्याचे आचार्य महामंडलेश्वर आणि गुरू स्वामी कैलाशानंद गिरी यांच्या शिबिराससमोर हर्षा रिछारिया दिसून आली आहे. यानंतर महाकुंभमधील साधूंमध्ये दोन गट पडले आहेत. हर्षाचे गुरू निरंजीन आखाड्याचे आचार्य महामंडलेश्वर कैलाशानंद गिरी यांनाच कुंभमेळ्यातून बाहेर काढा, अशी मागणी शांभवी पीठाधीश्वर महाराज आनंद स्वरुप यांनी केली आहे.
कैलाशानंद यांना सनातनची संत संस्कृती आणि निरंजनी आखाड्याच्या परंपरेचे ज्ञान नाही. मॉडेलला भगावे कपडे घालून शाही मिरवणूक घडवून त्यांनी परंपेरा मलीन केली. आखाडा परिषद आणि निरंजनी आखाड्याचे अध्यक्ष श्रीमहंत रविंद्र पुरी यांची भेट घेऊन आपण कैलाशानंद यांना आचार्य महामंडलेश्वर पदावरून हटवण्याची आणि आखाड्याच्या बाहेर करण्याची मागणी केल्याचे आनंद स्वरुप महाराज यांनी सांगितले.
‘संन्यास परंपरेचा अपमान’
हर्षाचे कुटुंबीय तिचे लग्न लावणार आहेत. पुढच्या महिन्यात तिचे लग्न आहे. मुलीला सन्यास घेऊ देणार नाही, असे तिचे कुटुंबीय म्हणत आहेत. ती गृहस्थ स्वीकारणार की संन्याय? हे अद्याप निश्चित नाही आणि तुम्ही तिला रथावर बसवता. हा संन्यास परंपरेचा अपमान आहे. अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनीही आनंद स्वरुप यांचे समर्थन केले आहे. संन्यास घ्यायचा की लग्न करायचं? हे अजून ती ठरवू शकत नाही, मग तिला संत महंतांच्या शाही रथावर स्थान देणं योग्य नाही. भाविक म्हणून सहभागी झाली असती तरी चाललं असतं. पण भगवे कपडे घालून शाही रथावर बसवणं पूर्णपणे चुकीचं आहे, असे शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती म्हणाले.
हर्षाला महंतांचे समर्थन
भगवे कपडे फक्त संन्यासी किंवा संतच घालू शकतात असे नाही तर, ज्यांना सनातन समजायचा आहे ते ही परिधान करू शकतात. हर्षा रिछायरिया त्यांना मुली समान आहे आणि तिने भगवे कपडे परिधान करण्यावर कोणाला हरकत नसावी. सनातनचा प्रचार व्हावा, अनेक तरुण-तरुणी आल्या तर यातून सनातन च अधिक बळकट होईल, असे श्रीमहंत रविंद्र पुरी म्हणाले.