काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी गुरुवारी रात्री एम्स रुग्णालयाची पाहणी केली. यावेळी त्यांनी उपस्थित रुग्णांची आणि नातेवाईकांची चौकशी केली. त्यानंतर राहुल गांधी यांनी दिल्ली सरकार आणि केंद्र सरकारवर टीक केली.
राहुल गांधी म्हणाले की, एम्सच्या बाहेर नरक आहे. एम्सच्या बाहेर देशभरातून आलेले गरी रुग्ण आणि त्यांचे कुटुंबीय हे थंडीत उपाशी बसले आहेत. त्यांच्याकडे ना घर आहे ना अन्न ना पाणी ना शौचालय. 21 व्या शतकातही अशी अवस्था आहे, ही बाब अतिशय दुर्दैवी आहे. इथे लोक तडफडून मरत आहेत असे गांधी म्हणाले.
एका रुग्णाने राहुल गांधींना सांगितले की इथे कुणी बिहारहून आलंय. तर कोणी उत्तर प्रदेशहून. थंडीने आमचा जीव चाललाय, इथे ना अन्न आहे ना ना पाणी. गेल्या 15 दिवसांपासून डॉक्टर आम्हाल फक्त इथून तिथे आणि तिथून पाठवत आहेत. सहा वाजल्यानंतर रुग्णालयाबाहेर हाकललं जातं असेही या रुग्णाने सांगितलं. आम्ही तुमच्या मदतीसाठी आलो आहोत असे राहुल गांधी यांनी या रुग्णांना सांगितलं.
AIIMS के बाहर नरक!
देशभर से आए ग़रीब मरीज और उनके परिवार AIIMS के बाहर ठंड, गंदगी और भूख के बीच सोने को मजबूर हैं।
उनके पास न छत है, न खाना, न शौचालय और न पीने का पानी।
बड़े-बड़े दावे करने वाली केंद्र और दिल्ली सरकार ने इस मानवीय संकट पर आंखें क्यों मूंद ली हैं? pic.twitter.com/wwnm8Fc3i8
— Rahul Gandhi (@RahulGandhi) January 18, 2025