जेव्हा सरकारने लाडकी बहीण योजना आणली होती तेव्हा यात त्रुटी असतील हे सरकारला माहित नव्हतं का असा सवाल काँग्रेस नेते नाना पटोले यांनी विचारला आहे. तसेच जेव्हा महिलांची मतं घेतली तेव्हा त्रुटी माहित नव्हत्या का असेही पटोले म्हणाले
ज्या महिला लाडक्या बहीण योजनेसाठी पात्र नाहीत अशा महिलांचे अर्ज बाद होणार असे सरकारने म्हटले आहे. आपल्याला दंड होऊ नये म्हणून 4 हजार महिलांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ नको म्हणू अर्ज केला आहे.
नाना पटोले म्हणाले की, जेव्हा महिलांची मतं घेतली, तेव्हा पडताळणी केली होती का? सरकारने जेव्हा लाडकी बहीण योजना आणली तेव्हा या योजनेत त्रुटी येतील हे सरकारला माहित नव्हतं का? महिलांच्या नावांनी काही पुरुषांनीच पैसे घेतल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच सांगितले. या सरकारने सांगितलं की आम्हाला लाडक्या बहीणींचा आशिर्वाद आहे. मग आता पडताळणीची गरजच काय? असेही पटोले म्हणाले.