राज्यात दहावी बारावीची परीक्षा होऊ घातली आहे. या परीक्षेचे हॉल तिकीट विद्यार्थ्यांना देण्यात आले आहे. पण या हॉल तिकिटावर विद्यार्थ्यांची जात देण्यात आली आहे. या निर्णयावर शिक्षक आणि शिक्षकतज्ज्ञांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. शिक्षण विभागाच्या या कारभारामुळे गदारोळ झाला आहे.
दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेपूर्वी हॉल तिकीट दिले जाते. या हॉल तिकिटावर विद्यार्थ्यांचे नाव, केंद्र क्रमांक, सीट क्रमांक, विषय असे तपशील असतात. पण यंदा या हॉल तिकीटावर जात प्रवर्गाचाही समावेश करण्यात आला आहे. यावर शिक्षण विभागाने स्पष्टीकरण दिले आहे. जेव्हा एखादा विद्यार्थी दहावी किंवा बारावी पास होतो. तेव्हा ट्रान्सफर सर्टिफिकेट देताना त्यात जातीचा उल्लेख चुकू नये म्हणून हॉल तिकीटावर जातीचा उल्लेख केल्याचे स्पष्टीकरण शिक्षण विभागाने दिले आहे.