लग्न, पूजेत ठीक आहे पण राजकारणात धर्म कशाला, प्रणिती शिंदे यांचा सवाल

आपल्या देशाचा कणा, देशाचा आत्मा सर्वधर्म समभाव आहे. लग्न, पूजा करायची असेल तर ठीक आहे, पण निवडणूक आणि राजकारणामध्ये धर्म, जात कशाला आणता, असा सवाल कॉँग्रेस खासदार प्रणिती शिंदे यांनी केला. मी देशासाठी काम करते, मी कोणत्या एका धर्मासाठी समाजासाठी काम करत नाही. जे गरीब आहेत त्याच्यासाठी मी काम करते. आज मला या देशाचे वाईट वाटतेय, असे सांगत प्रणिती शिंदे यांनी जातीय व धार्मिकतेच्या मुद्दय़ावरून सत्ताधाऱयांवर टीका केली.