तामीळनाडूत जीवघेणा ‘जलीकट्टू’, 7 ठार; 400 हून अधिक जखमी

तामीळनाडूत जलीकट्टू दरम्यान एकाच दिवसात सात जणांना आपला जीव गमवावा लागला, तर 400 हून अधिक जण जखमी झाले आहेत. येथील या धाडसी खेळाची नेहमीच चर्चा रंगत असते. गुरुवारी पोंगल निमित्त राज्यातील विविध ठिकाणी जलीकट्टू स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. मृतांमध्ये सहा प्रेक्षकांचा समावेश असल्याचे आज पोलिसांनी सांगितले. तर एक जण जलीकट्टूमध्ये सहभागी झाला होता. तसेच दोन बैलांचादेखील मृत्यू झाला आहे. कन्नम पोंगल या दिवशी परंपरेप्रमाणे सर्वाधिक जलीकट्टू खेळला जातो.

पडुकोट्टई, करूर आणि त्रिची या तीन जिह्यांमध्ये जलीकट्टू कार्यक्रमांमध्ये 17 बैल मालक आणि 33 प्रेक्षकांसह 156 लोक जखमी झाले. विविध ठिकाणी बैलांनी प्रेक्षकांमध्ये प्रवेश केल्याने अपघात झाला. यंदाची पहिली जलीकट्टूची पहिली स्पर्धा पुडुक्कोटाईच्या गंडारावकोट्टई परिसरात झाली होती