यापुढे भाडेतत्त्वावर बसेस न घेता स्वतःच्या मालकीच्या 5 हजार लाल परी बसेस खरेदी करण्याचा महत्त्वाचा निर्णय एसटी महामंडळाने घेतला आहे. त्यासाठी पंचवार्षिक नियोजन केले जाणार आहे. पुढील पाच वर्षांत किती बसेस भंगारात काढाव्या लागणार आहेत त्याचे गणित करून नवीन बसेस खरेदीचे नियोजन महामंडळाकडून केले जाणार आहे.
एसटीमध्ये इलेक्ट्रिक बसेस आणल्या जाणार असून त्यासाठी प्रत्येक आगारामध्ये चार्ंजग स्टेशन उभारले जाणार आहे. एसटी महामंडळाला बसेसवरील जाहिराती हे उत्पन्नाचे साधन आहे. ते वाढवण्यासाठी बसेसवर दोन्ही बाजूला आणि पाठीमागे अशा तीन ठिकाणी डिजिटल जाहिराती करण्याचाही महामंडळाचा मानस आहे. राष्ट्रीय महामार्गांवरील टोलमाफी आणि डिझेलवरील व्हॅटमध्ये सवलत मिळावी यासाठीही प्रयत्न केले जाणार आहेत.