गेल्या आठवडय़ात लॉस एंजेलिस येथे लागलेल्या आगीत 20 पेक्षा अधिक लोक मृत्युमुखी पडले आहेत. सुमारे 40 हजार एकर जमीन आगीच्या भक्ष्यस्थानी पडली आहे. प्रशासनाने हजारो लोकांना घरे सोडून जायचे आदेश दिले आहेत. आगीची झळ हॉलीवूड सेलिब्रेटींनाही बसली आहे. या दुःखद घटनेच्या पार्श्वभूमीवर लॉस एंजेलिस येथे रंगणाऱया ऑस्कर सोहळ्यावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. ऑस्कर सोहळा रद्द होणार अशी चर्चा गेल्या दोन दिवसांपासून रंगली आहे. मात्र ऑस्कर सोहळा होणार असे संकेत मिळत आहेत. कारण ऑस्कर अकॅडमीने आगीच्या परिस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी स्पेशल कमिटी गठीत केली आहे.