Chhatrapati Sambhajinagar News- रेल्वे इंजिनवर चढलेल्या तरुणाने विजेच्या तारेला पकडलं, गंभीर भाजला

छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्थानकात एका तरुणाने डेक्कन ओडिसी (Deccan Odyssey) रेल्वेच्या इंजिनवर चढून विजेच्या तारेला स्पर्श केला. विजेचा प्रवाह शरीरात उतरल्याने तो गंभीररित्या भाजला आहे. RPF च्या जवानांनी तातडीने त्याला खाली उतवले आणि उपचारार्थ घाटी रुग्णालयात दाखल केले आहे.

सदर घटना शुक्रवारी (17 जानेवारी 2025) सकाळी साडेदहा वाजता घडली. सकाळी साडेदहा वाजता देशी, विदेशी पर्यटकांना घेऊन येणाही डेक्कन ओडिसी ही मुख्य रेल्वे स्थानकावर प्लॅटफॉर्म क्रमांक 2 वर दाखल झाली. या रेल्वेमध्ये जवळपास 50 विटेशी पर्यटकांचा समावेश होता. याचवेळी एक 30 ते 32 वय असणारा मनोरुग्ण रेल्वे इंजिनवर चढला आणि त्याने विजेच्या तारांना स्पर्श केला. यामुळे तो गंभीर भाजला आहे. रेल्वे पोलिसांनी त्याला तत्काळ खाली आणले रुग्णालयात दाखल केले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डेक्कन ओडिसी रेल्वे प्लॅटफॉर्म क्रमांक 2 वर उभी होती. एकीकडे विदेशी पर्यटकांचे स्वागत सुरू होते, तर दुसरीकडे मनोरुग्ण तरुण इंजिवर चढला आणि त्याने थेट विजेच्या तारेला पकडले. त्यामुळे तो गंभीर भाजला आहे. सदर घटना रेल्वे पोलिसांच्या लक्षात येताच त्यांनी त्याला खाली उतरवले आणि उपचार करण्यासाठी घाटी रुग्णालयात दाखल केले आहे. याप्रकरणी रेल्वे पोसील ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.