Delhi election 2025 – महाराष्ट्रात 1500 देताना नाकीनऊ, दिल्लीत 2500 चा जुमला! भाजपचा जाहिरनामा प्रसिद्ध

लाडकी बहीण योजना जाहीर करत महायुतीने विधानसभा निवडणुकीत यश मिळवले. सत्तेत आल्यानंतर लाडक्या बहिणांना निकषांची कात्री लावत झुलवत ठेवले आहे. विजयानंतर महिन्याला 2100 रुपये देणार, अशी घोषणा केली होती. पण अद्याप लाडक्या बहि‍णींना 2100 रुपये काही मिळालेले नाही. आता दिल्ली विधानसभा निवडणुकीतही भाजपने जाहिरनाम्यातून महिलांना 2500 रुपये देण्याची घोषणा केलेली आहे. त्यामुळे हाही जुमला ठरतो की काय? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

विधानसभा निवडणुकीत महायुती सरकारने लाडकी बहीण योजनेचा चांगलाच गाजावाजा केला होता. गावोगावी लाखो रुपये खर्च करून कॅम्पेन चालवले होते. सत्तेत आल्यावर लागलीच लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100 रुपये देऊ अशी घोषणाही केली. पण सत्तेत आल्यावर लाडक्या बहिणींना 2100 रुपये तर सोडा 1500 रुपये देतानाही सरकारच्या नाकीनऊ येत आहेत. जानेवारी महिन्याचा हप्ताही अद्याप महिलांच्या खात्यात जमा झालेला नाही. अशातच दिल्लीतही भाजपची नजर महिला मतांवर असून त्याच अनुषंगाने लाडक्या बहि‍णींना 2500 रुपये देण्याची घोषणा केली आहे. यासह होळी आणि दिवाळीला प्रत्येक एक गॅस सिलिंडर मोफत देण्याची घोषणाही भाजपने केली आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी शुक्रवारी पक्षाचा जाहिरनामा प्रसिद्ध केला.

भाजपच्या जाहिरनाम्यातील ठळक मुद्दे –

– एलपीजी गॅस सिलिंडरवर 500 रुपये सब्सिडी
– महिलांना प्रत्येक महिन्याला 2500 रुपये
– गर्भवती महिलांना 21000 रुपये
– गर्भवती महिलांना न्यूट्रीशनल कीट
– होळी आणि दिवाळीला एक-एक गॅस सिलिंडर मोफत
– पाच लाखांपर्यंत अतिरिक्त आरोग्य विमा
– आयुष्मान भारत योजना दिल्लीत लागू करणार
– अटल कॅन्टिन योजना आणणार
– झोपडीत राहणाऱ्यांना 5 रुपयात राशन देणार
– वरिष्ठ नागरिकांना 3000 रुपयांपर्यंत पेन्शन

‘लाडकी बहीण’ योजनेसाठी पैसे आहेत, मग जजसाठी का नाहीत? सुप्रीम कोर्टाने राज्यांना फटकारले

भाजप 68 जागा लढणार

दरम्यान, दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस आहे. दिल्लीत 70 जागांसाठी 5 फेब्रुवारीला मतदान होणार आहे. भाजप दिल्लीमध्ये 70 पैकी 68 जागा लढणार असून दोन जागा जेडीयू आणि लोक जनशक्ती पार्टी (रामविलास) यांना सोडण्यात आल्या आहेत.

दिल्लीतही लाडकी बहीण