बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान याच्यावरी चाकूहल्ला प्रकरणी मुंबई पोलिसांनी एकाला ताब्यात घेतले आहे. पण हा संशयित हल्लेखोर नसल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. ताब्यात घेतलेली व्यक्ती ‘तो’ हल्लेखोर नाही, असे पोलीस उपायुक्त दीक्षित गेडाम यांनी सांगितले. त्यामुळे सैफ अली खानवर हल्ला प्रकरणात अद्याप कोणालाही अटक झालेली नाही. 30 तासांहून अधिका काळ उलटूनही सैफवर हल्ला करणारा हल्लेखोर मुंबई पोलिसांच्या हाती लागलेला नाही.
पोलिसांनी जो संशयित ताब्यात घेतला आहे त्याचा फोटो लीलावतीमधील पोलिसांना पाठवण्यात आला आहे. पकडलेल्या संशयिताची करीना कपूर आणि मतदनीस यांच्याकडून ओळख पटवण्यात येणार आहे. दरम्यान, 30 तासांहून अधिक काळ लोटला तरी मुंबई पोलिसांच्या हाती अद्याप आरोपीला लागलेला नाही.
सैफवर हल्ला करणाऱ्या घुसखोराचा माग काढण्यासाठी आणि त्याला पकडण्यासाठी 20 पथके तयार केली आहेत. आणि त्याला शोधण्यासाठी खबऱ्यांच्या नेटवर्कचा वापर केला जात आहे. सैफवर हल्ला झाला त्यावेळी परिसरात किती मोबाईल फोन सक्रिय होते? याचा तांत्रिक डेटा गुन्हे शाखा आणि स्थानिक पोलिसांनी तांत्रिक डेटा गोळा केला आहे., अशी माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली. सैफ अली खानच्या घरातून आणि इमारतीतून फॉरेन्सिक टीम आणि श्वान पथकाच्या मदतीने पुरावे गोळा करण्यात आले आहेत. हल्लेखोराचा माग घेण्यासाठी मुंबईत अनेक ठिकाणी शोध घेण्यात आला आहे, असे पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.