बेस्ट उपक्रमातील खासगी ओलेक्ट्रा कंपनीच्या बस असलेल्या सर्व आगारात कंत्राटी कामगार बस वाहक, चालक वर्गाने आज काम बंद आंदोलन पुकारले आहे. पगार न मिळाल्याने त्यांनी काम बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या सदर ओलेक्ट्रा कंपनीच्या खासगी बसवर बेस्टचे कायमस्वरुपी कामगार पाठविण्याचे काम चालू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार मुंबई सेंट्रल आगारात 100 बस, काळकिल्ला आगारात 60 बस, तर कुर्ला आगारात 80 बस या ओलेक्ट्रा कंपनीच्या आहेत.