देशात आता मोठ्या प्रमाणात इलेक्ट्रिक वाहने लॉन्च होत आहेत. नवीन मॉडेल्स कार मार्केटमध्ये येत आहेत. कार कंपन्या आता बजेट फ्रेंडली ईव्हीवर काम करत आहेत, जेणेकरून इलेक्ट्रिक कार अधिकाधिक लोकांच्या खिशाला परवडू शकेल. देशी-विदेशी कार कंपन्या कमी किमतीच्या इलेक्ट्रिक कारवर काम करत आहेत.
यातच लिगियर मिनी इलेक्ट्रिक कार हिंदुस्थानात टेस्ट दरम्यान दिसली आहे. युरोपियन मॉडेलवर आधारित, ही 2-सीटर मिनी EV एका चार्जवर 63 किमी ते 192 किमी पर्यंत रेंजसह वेगवेगळ्या बॅटरी पॅक पर्यायांमध्ये येऊ शकते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, ही कार देशात 1 लाख रुपयांच्या किंमतीत लॉन्च केली जाऊ शकते. असं झाल्यास ही देशातील स्वस्त इलेक्ट्रिक कार ठरू शकते.
बॅटरी आणि रेंज
Ligier Mini EV हिंदुस्थानी बाजारपेठेत G.OOD, I.DEAL, E.PIC आणि R.EBEL या 4 प्रकारांमध्ये ऑफर केली जाऊ शकते. यात 4.14 kWh, 8.2 kWh आणि 12.42 kWh कॅनसह 3 बॅटरी पॅक पर्याय मिळतील. बॅटरी रेंजबद्दल बोलायचे झाले तर ही कार एका चार्जवर 63 किलोमीटर, 123 किलोमीटर आणि 192 किलोमीटरपर्यंतची रेंज देऊ शकते. असं असलं तरी हिंदुस्थानात ही कार लॉन्च होणार की नाही, याबद्दल अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. मात्र आगामी काळात या नवीन मॉडेलबाबत अधिकृत अपडेट्स मिळतील, अशी अपेक्षा आहे.
डिझाइनच्या बाबतीत, नवीन लिगियर मिनी इलेक्ट्रिक कार लहान असेल, ती मोपेड डिझाइनमध्ये येऊ शकते. या EV ची लांबी 2958mm, रुंदी 1499mm आणि उंची 1541mm असू शकते. युरोपियन मॉडेलवर आधारित या ईव्हीमध्ये फक्त दोन दरवाजे दिसणार आहेत. यामध्ये 12 ते 13 इंची व्हील्स मिळू शकतात.
Ligier Mini EV चा आतील भाग स्पोर्टी असेल. 10-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, ॲपल कार प्ले आणि अँड्रॉइड ऑटो सपोर्ट, पॉवर स्टीयरिंग, हिट ड्रायव्हर सीटसह ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल आणि कॉर्नर एसी व्हेंट्स यासारखे फीचर्स यात मिळू शकतात.