महत्त्वाचे – एसटी चालकांची होणार अल्कोटेस्ट

एसटी गाडय़ांना होणाऱया अपघातांची राज्य परिवहन महामंडळाकडून गंभीर दखल घेण्यात आली असून एसटी चालकांची अल्कोटेस्ट होणार आहे. सुरक्षा खात्यातील पर्यवेक्षक, मार्ग तपासणी पथकातील पर्यवेक्षक यांच्यामार्फत ही तपासणी करण्यात येणार आहे. यासाठी अल्कोटेस्ट, ब्रेथ अॅनालायझरचा वापर करण्यात येणार आहे. विशेषतः मुक्कामी असणाऱया चालक-वाहकांची तपासणी करण्यात येणार आहे. चालक-वाहकाने मद्यपान केल्याचे आढळून आल्यास त्यांच्याविरोधात कडक कारवाई केली जाणार आहे.

आयआयटी मुंबईत ई-पदविका

ई-मोबिलिटीमध्ये प्रगत शिक्षणासाठी भारतीय तंत्रज्ञान संस्था मुंबईने (आयआयटी) ई-पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रम सुरू केला आहे. हा 18 महिन्यांचा उद्योगकेंद्रित अभ्यासक्रम मार्च 2025 पासून सुरू करण्यात येणार आहे. आयआयटी मुंबई आणि एडटेक ग्रेट लर्निंग या पंपनीने ‘ई-मोबिलिटीचा पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रम’ तयार केला आहे. या अभ्यासक्रमासाठी सी 1973 ईव्ही पॉवर ट्रेन प्रयोगशाळा महत्त्वपूर्ण ठरणार आहे. आहेत, अशी माहिती आयआयटी मुंबईचे संचालक प्रा. शिरीष केदारे यांनी दिली.