2006 मध्ये नोंद झालेला एफआयआर व त्यानंतर दाखल झालेल्या आरोपपत्राची प्रत गहाळ झाल्याची धक्कादायक बाब उच्च न्यायालयाच्या निदर्शनास आणण्यात आली. त्याची गंभीर दखल घेत न्यायालयाने या दोन्ही प्रती शोधण्यासाठी पोलिसांना शेवटची संधी दिली आहे.
न्या. रवींद्र घुगे व न्या. राजेश पाटील यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी झाली. एफआयआर व आरोपपत्राची कॉपी गहाळ होणे आमच्यासाठी अनपेक्षित आहे, असे निरीक्षण नोंदवत न्यायालयाने ही सुनावणी 11 फेब्रुवारी 2025 पर्यंत तहकूब केली.
2019 पासून शोधमोहीम
रयान अरनाह यांनी ही याचिका केली आहे. त्यांच्याविरोधात 2006 मध्ये मारहाणीचा गुन्हा नोंदवण्यात आला. या गुह्यात मला जाणीवपूर्वक अडकविण्यात आले आहे. हा गुन्हा रद्द करावा, अशी मागणी याचिकेत करण्यात आली आहे. 2019 पासून पोलिसांची शोधमोहीम सुरू आहे, असे त्यांनी निदर्शनास आणले.