माहीम खाडीतील पाईपलाईनच्या खाली एका पुरुषाचा मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे. मृतदेहाची ओळख पटली नसून मृत व्यक्तीच्या उजव्या हाताच्या दंडावर प्रकाश असे गोंदवलेले आहे. याप्रकरणी माहीम पोलीस अधिक चौकशी करीत आहेत. माहीम येथील फिशरमन कॅालनीच्या मागच्या बाजूला असलेल्या खाडीतल्या पाईपलाईनखाली एका 40 ते 45 वयोगटातील व्यक्तीचा बुधवारी मृतदेह आढळून आला. मृतदेह पाण्याच्या बाहेर काढून त्याची पाहणी केली असता मृत व्यक्तीचे दोन्ही पाय बांधलेले आढळून आले. शिवाय डाव्या पाय आणि उजव्या हाताच्या दंडावर जखमा आहेत. शिवाय अंगावर काळय़ा रंगाची फुल पॅण्ट, त्यावर सुप्रीम आर्ट वसई असा टेलर मार्प, पिटर इंग्लंड कंपनीचा निळय़ा रंगाचा शर्ट, त्यावर निळय़ा रंगाची नक्षी आहे. माहीम पोलीस अधिक तपास करीत आहेत.
सिडबीकडून 200 कोटी स्टार्टअपसाठी
मुंबई – स्मॉल इंडस्ट्रिअल डेव्हलपमेंट अर्थात सिडबीकडून राज्यात स्टार्ट अप सुरु करण्यासाठी 200 कोटी रुपयांची तर प्रत्येक प्रादेशिक विभागासाठी 30 कोटी रुपयांची तरतूद करणार येणार आहे. या माध्यमातून राज्यात नाविन्यता शहराची स्थापना करण्यात येणार आहे. अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिली. बांद्रा-पुर्ला संपुल येथील जिओ वर्ल्ड ट्रेड सेंटरमध्ये काwशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभागांतर्गत राज्य नाविन्यता सोसायटीच्यावतीने ‘एम्पॉवरींग इनोव्हेशन, एलिव्हेटिंग महाराष्ट्र’ या संकल्पनेवर आधारित ‘राष्ट्रीय स्टार्टअप्स दिवस’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला काwशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा, काwशल्य विकास विभागाचे सचिव गणेश पाटील, आयुक्त प्रदीपकुमार डांगे, व्यवसाय शिक्षण प्रशिक्षण संचालनालयाचे संचालक सतीश सूर्यवंशी उपस्थित होते.