शेअर्सच्या किमतीत फेरफार करणाऱया अदानी समूहाचा घोटाळा उघड करणाऱया हिंडनबर्ग रिसर्चचे संस्थापक नॅथन अँडरसन यांनी पंपनी बंद करण्याचा निर्णय आज जाहीर केला. त्यानंतर अदानी समूहाच्या शेअर्समध्ये 9 टक्क्यांपर्यंत वाढ झाल्याचे दिसले. पंपनी बंद करण्याच्या निर्णयानंतर अँडरसन यांनी एक्सवर पोस्ट करत आम्ही सत्याची वाट सोडली नाही. त्यामुळेच अब्जाधीशांचे घोटाळे उघड करू शकलो, ही वाटचाल करू शकलो, असे म्हटले आहे.
हिंडनबर्ग रिसर्चने सेबीच्या अध्यक्षा माधबी पुरी बुच यांच्यावरही आरोप केले होते. अदानी घोटाळ्याशी संबंधित असलेल्या दोन परदेशी फंडांमध्ये माधबी पुरी बूच यांनी गुंतवणूक केल्याचा आरोप हिंडनबर्गने केला होता. हिंडनबर्ग रिसर्चने दोन वर्षांपूर्वी उद्योगपती गौतम अदानी यांच्या पंपन्यांविषयी काही अहवाल प्रसिद्ध केले होते. या अहवालामुळे अदानी समूहाचे अब्जावधी डॉलर्सचे नुकसान झाले होते. पुन्हा 2023मध्ये हिंजनबर्गने अदानींना लक्ष्य केल्यामुळे त्याचे अदानींना मोठे आर्थिक परिणाम भोगावे लागले होते.
n बीएसईवर अदानी पॉवरचे शेअर्स 9 टक्क्यांनी वाढून दिवसाच्या उच्चांकी 599.90 रुपयांवर, अदानी ग्रिन एनर्जी 8.8 टक्क्यांनी वाढून 1,126.80 रुपयांवर, अदानी एंटरप्रायझेसचे शेअर्स 7.7 टक्क्यांनी वाढून ते 2,569.85 रुपयांवर, अदानी टोटल गॅसमध्ये 7 टक्के वाढ होऊन ते 708.45 रुपयांवर पोहोचले.
सर्व लढे सत्य समोर आणण्यासाठी
भ्रष्टाचार, खोटेपणा, गैरव्यवहार यावर आम्ही पुराव्यांसह प्रहार केले. कोणत्याही व्यक्ती किंवा साम्राज्यापेक्षा मोठे लढे आम्ही दिले. हे लढे सत्य समोर आणण्यासाठी होते. लबाडी, भ्रष्टाचार, नकारात्मकता याचा सुरुवातीचा परिणाम हा प्रभावीच वाटतो. परंतु आम्ही सत्याची वाट सोडलेली नाही, त्यामुळे ही वाटचाल करू शकलो, असे अँडरसन यांनी म्हटले आहे. आम्ही केलेल्या कामामुळे किमान 100 व्यक्तींच्या विरोधात दिवाणी खटले दाखल झाले आहेत, यात काही अब्जाधीश आणि उच्चभ्रूंचा समावेश आहे, असे अँडरसन यांनी म्हटले आहे.
आम्ही जे ठरवले ते पूर्ण झाले
आम्ही जे काही ठरवले होते ते पूर्ण झाल्याने आता आम्ही कंपनी बंद करत आहोत, असे अँडरसन यांनी एक्सवरील पोस्टमध्ये म्हटले आहे.