एमडी ड्रग्जची तस्करी करण्यासाठी आलेल्या एका नायजेरियनला अटक करण्यात गुन्हे शाखेच्या अमली पदार्थविरोधी पथकाला यश आले आहे. जॉन जेम्स फ्रान्सिस ऊर्फ ओनाह चिडोझी एथलबर्ट ऊर्फ जॉन इझुग्वा फ्रान्सिस (45) असे अटक केलेल्या नायजेरियनचे नाव आहे. हा नायजेरियन सराईत गुन्हेगार असून तो 6 वर्षे शिक्षा भोगून नोव्हेंबर 2024मध्ये कारागृहातून बाहेर आल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे.
शिळफाटा येथील खिडकाळी रोडवरील देसाईनाका परिसरात एक जण एमडी ड्रग्जची तस्करी करण्यासाठी येणार असल्याची माहिती अमली पदार्थविरोधी पथकाला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता पोलिसांना त्याच्याकडून 66 लाख 18 हजार रुपये किमतीची 661.8 ग्रॅम एमडी पावडर मिळून आली. त्यानुसार पोलिसांनी शीळ डायघर पोलिसांनी त्याला अटक केली.