इन्स्टाग्रामला टक्कर देण्यासाठी बाजारात एक नवीन ॲप Pixelfed आले आहे. हे ॲप आता Android आणि iOS या दोन्ही प्ले स्टोरवर सक्रिय झाले आहे. त्यामुळे इन्स्टाग्रामच्या चिंतेत भर पडली आहे.
Instagram हे एक लोकप्रिय असलेल फोटो-व्हिडिओ शेअरिंग ॲप आहे. या ॲपची तरुणांमध्ये मोठी क्रेझ आहे. मात्र आता इन्स्टाला टक्कर देण्यासाठी बाजारात नवीन ॲप सुरू करण्यात आले आहे. हे ॲप अगदी इन्स्टाग्रामसारखं आहे. नवीन ॲप हे युझर्सच्या अधिक पसंतीस पडत आहे. त्यातील फिचर्समुळे ते अधिक लोकप्रिय होत असल्याचे समजले आहे. Pixelfed अशा नेटवर्कवर काम करते, ज्यामुळे युझर्सला डेटा आणि कंटेंटवर जास्त नियंत्रण मिळू शकते. या ॲपमध्ये युझर्स फोटो शेअर करू शकतात. दुसऱ्याला फॉलो करू शकतो. याशिवाय विविध लोकांशी चॅटसुद्धा करता येते. हा प्लॅटफॉर्म फोडाईवर्ससोबत कनेक्ट आहे. हे ॲप मॅस्टोडॉन सारख्या इतर एक्टिविटीपब-बेस्ड नेटवर्कवर काम करते.
मेटाच्या कंटेंट मॉडरेशने केलेल्या घोषणेनंतर Pixelfed ॲप बाजारात दाखल करण्यात आले आहे. हे ॲप याच आठवड्यात लाँच करण्यात आले आहे. अनेक युझर्सने दावा केला आहे की, त्यांनी या नवीन ॲपची लिंक फेसबुकवर शेअर केली. पण मेटाने ही लिंक ब्लॉक केली आहे. Engadgetने दिलेल्या माहितीनुसार मेटाने चुकीने Pixelfed लिंक ब्लॉक केली. मात्र Pixelfed ॲप ची लिंक ॲक्टिव दिसत आहे. Pixelfed चे सीईओ आणि संचालक डॅनियल सुपरनॉल्ट यांनी गेल्या ऑक्टोबरमध्ये TikTok ला पर्यायी loops हे ॲप सुरू केले होते. मेटाच्या कंटेंट मॉडरेशनमुळे वैतागलेल्या युजर्सला नवीन Pixelfed आणि loops हे दोन चांगले पर्याय मिळाले असल्याचा दावा करण्यात येत आहे.