‘सायबर गुन्हे व फसवणूक कशी टाळता येईल’ यावर जनसहयोग फाऊंडेशन या संस्थेच्या वतीने मुंबई पोलीस दलातील सायबर अधिकारी विवेक तांबे यांचे व्याख्यान दहिसर (पश्चिम) रंगनाथ केसकर रोड येथील ‘बोनावेन्चर’ या सोसायटीमध्ये रविवार दि. 19 जानेवारी रोजी सकाळी 10.30 वाजता आयोजित करण्यात आले आहे.
जनसहयोग संस्थेचे अध्यक्ष प्रभाकर पवार यांनी ही माहिती एका पत्रकाद्वारे दिली आहे. सायबर माफिया रोज नवनवीन युक्त्या रचून लोकांची फसवणूक करीत आहेत. डिजिटल अटकेची भीती दाखवून खंडणी उकळत आहेत. ‘डीपफेक’ या भयंकर आधुनिक तंत्राचा वापर करून महिलांची बदनामी करीत आहेत. त्यामुळे लोकांमध्ये प्रचंड घबराट निर्माण झाली आहे. याला आळा बसावा म्हणून जनसेवक फाऊंडेशनतर्फे पोलिसांचे विनामूल्य व्याख्यान 19 जानेवारी रोजी दहिसर (प.) येथे आयोजित केले आहे, अशी माहिती प्रभाकर पवार यांनी दिली.