बदली-दलाली यापासून दूर राहा, आमदारांना मोदींनी सुनावले

बदली, दलालीपासून दूर राहा, सरकार दरबारी बदली, दलाली अशा कामांपासून स्वतःला दूर ठेवा. सरकारी अधिकाऱयांशी नम्रपणे बोला. तुम्ही जनतेमध्ये जा, लोकांचे म्हणणे ऐकून घ्या, अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज महायुतीच्या आमदारांना खडे बोल सुनावले.

तुम्ही जनतेमध्ये जा, लोकांचे म्हणणे ऐकून घ्या. तुमच्या कामाबद्दल जनतेचे काय मत आहे ते जाणून घ्या, असेही ते म्हणाले. युद्धनौकांचे राष्ट्रार्पण केल्यानंतर त्यांनी नौदल गोदीमधील आंग्रे सभागृहात महायुतीच्या सर्व आमदारांसोबत संवाद साधला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार आदी उपस्थित होते. बैठकीत मोबाईलबंदी होती.

10 आमदारांची अनुपस्थिती

बैठकीला अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे, जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, माजी मंत्री छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, आमदार सरोज अहिरे, राजू नवघरे, प्रकाश सोळंके, इद्रीस नाईकवडी आदी गैरहजर होते.