रशियाने युक्रेनवर गेल्या तीन वर्षांतील सर्वात मोठा हल्ला केला असून काळ्या समुद्रातून टीयू-95 बॉम्बरमधून क्रूझ क्षेपणास्त्रांचा मारा केला. रशियाने युक्रेनमधील तब्बल 100 हून अधिक ठिकाणी क्षेपणास्त्र डागली. युक्रेनने केलेल्या हल्ल्याला रशियाने प्रत्युत्तर दिल्याचे मानले जात आहे. युक्रेनने मंगळवारी रात्री रशियावर हल्ला केला होता. रशियाच्या हल्ल्यानंतर युक्रेनमध्ये अनेक ठिकाणी सायरन वाजू लागले. कीव्हमध्ये आणीबाणी जाहीर करण्यात आली असून नागरिकांनी बंकरचा आसरा घेतल्याचे चित्र आहे.
अनेक शहरे अंधारात बुडाली
रशियाच्या हल्ल्यानंतर युक्रेनने बचावात्मक धोरण अवलंबले असून अनेक शहरातील वीजपुरवठा खंडित केला आहे. याबाबत युक्रेनच्या &ऊर्जामंत्र्यांनी फेसबुकवरून याबाबतची माहिती दिली तसेच रशिया युक्रेनला घाबरवण्यासाठी असे हल्ले करत असल्याचे म्हटले आहे. खाकीव्ह, सूमी, पाल्टोवा, जापोराजिया या शहरांमध्ये वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे.