मुंबई, पुण्यासह राज्यभरात बाईक टॅक्सी

ओला, उबरप्रमाणेच मुंबई-पुण्यासह राज्यभरात आता बाईक टॅक्सी सेवा सुरू करण्यात येणार आहे. यासंदर्भात ‘महाराष्ट्र अॅग्रीगेटर रेग्युलेशन 2024’ मसुदा तयार करण्यात आला आहे. पुढील दोन महिन्यांत परिवहन विभागाकडून याची अंमलबजावणी होण्याची शक्यता आहे. मुंबई-पुण्यासारख्या शहरात मध्यंतरी काही पंपन्यांनी बाईक टॅक्सी सेवा सुरू केली होती, परंतु हे बेकायदेशीर असून आपला रोजगार बुडत असल्याचा आरोप रिक्षा संघटनांनी केला होता. यामुळे ही सेवा बंद करण्यात आली होती. मुंबई आणि इतर महानगरांमधल्या वाहतूककाsंडीवर मात करण्यासाठी राज्य सरकारने बाईक टॅक्सीला कायदेशीर मान्यता देण्याचे महत्त्वाचे पाऊल उचलले आहे.