वाल्मीक कराडचे वाकडमधील उच्चभ्रू सोसायटीत फ्लॅट

बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मीक कराडच्या अमाप संपत्तीबाबत अनेक धक्कादायक खुलासे समोर येत असतानाच पिंपरी-चिंचवड शहरातदेखील कराड आणि त्याच्या पत्नीच्या नावे वाकडमधील उच्चभ्रू अशा सोसायटीमध्ये कोटय़वधी रुपयांचे दोन फ्लॅट असल्याचे समोर आले आहे. यामधील पह्र बीएचके फ्लॅटचा कराडने 2021 पासून दीड लाख रुपयांचा मालमत्ता कर भरला नाही. त्यामुळे महापालिकेने फ्लॅट सील करण्यासंदर्भात नोटीस बजावली आहे. कर न भरल्यास लिलावही करण्यात येणार आहे.