स्टारबक्स कंपनीने आपल्या सर्व्हिसमध्ये एक मोठा बदल करण्याचे ठरवले आहे. कंपनी आता आपल्या कॅफेमध्ये शौचालयाचा वापर कोणालाही करू देणार नाही. जे ग्राहक काही तरी खरेदी करतील, पैसे मोजतील अशाच ग्राहकांना शौचालयाचा वापर करता येणार आहे. कंपनीचा हा नियम 27 जानेवारीपासून सर्व स्टारबक्सच्या कॅफेत लागू होणार आहे. ग्राहकांना चांगला अनुभव देण्यासाठी कंपनीने हा निर्णय घेतला आहे. कंपनीने यासाठी एक नवीन कोड ऑफ कंडक्ट जारी केले आहे. जे ग्राहक काही खरेदी करतील फक्त तेच बाथरूमचा वापर करू शकतील. याशिवाय कर्मचाऱ्यांना नियमांची अंमलबजावणी करण्यासाठी प्रशिक्षण दिले जाणार आहे. जर कोणी हा नियम मोडण्याचा प्रयत्न केला, तर त्याला कॅफेतून बाहेर काढण्यास सांगितले आहे.